आज अधोरेखित होतंय...
(केवळ) स्त्री क्षणभराची बायको...
आणि जन्मभराची आई नसते...!
तर पुरूष (देखील) वटपौर्णिमेपुरता नवरा...
आणि जन्मभराचा बाप असतो...!
घरदार गणगोत मागे सोडून...
त्याच्यासवे सप्तपदी घालणाऱ्या
त्या सावित्रीचा, हा सत्यवान...
खरंतर पिता होतो...!
अन आपल्या लेकीच्या कन्यादानाने...
हा नवकोट नारायण...
एकदम रिता होतो..!
फार विलक्षण योग आहे आज...!
वटपौर्णिमा आणि पितृदिन एकाच दिवशी आहेत.
या दोन विशेष दिनांची संस्कृती आणि पार्श्वभूमी जरी भिन्न असली तरी, पुरुषांच्या आयुष्यातल्या दोन भूमिकांप्रती आदरभाव व्यक्त करणारे हे प्रसंग एकाच दिवशी यावेत हे खचितच खास..!
भावना न दाखवता... आनंदाच्या प्रसंगी आपल्या हर्षाचा भुईनळा न उडू देणं, पुरुषांची खासीयत मानली जाते...!
तर दुःख, वेदना, संकटांना सामोरं जाताना याच्या सहनशिलतेची कसोटी लागते...!
अशावेळी याच्या डोळ्यांना झरताही येत नाही...!
अन बायका पोरांच्या, आधारासाठी त्याच्यावर खिळलेल्या
डोळ्यांना, नजरेआड करताही येत नाही..!
पण...जेंव्हा आई, बहिण, बायको, मुलं
आणि इतरेजन, त्या त्या वेळी
कधी याच्या पाठीशी तर कधी सोबत उभे रहातात....!
तेंव्हा मात्र याच्या मनावर रोमांच उभे रहातात..!
तसेच रोमांच आज माझ्या मनावर उभे राहिले आहेत..!
(सहज सुचलं म्हणून लिहीलं)
मदन देशमुख, पुणे.
मस्त ... बाप असाच असतो आणि असावा !
ReplyDeleteछान
ReplyDeleteव्वा सुंदर लिहिलंय आजच्या सुवर्णयोगानिमित्ताने. खरेच दुर्मिळ योग आहे
ReplyDeleteमित्रा काय लिहू ।। वाचताना माझा अंगावर ही रोमांच उभे राहिले आणि एकोप्यात पाणावलेले डोळे हाताने पुसून काढले
ReplyDelete