जसप्रीत बुमराह म्हणजे काही छाप टाकणारं व्यक्तिमत्व नव्हे...! उलटपक्षी जरा अस्ताव्यस्त असाच वाटतो... त्याचा वावर लक्षवेधी नाही... उंचीपुरी.. तगडी देहयष्टी नाही... लयबद्ध धाव नाही... जुन्या काळातल्या मायकेल होल्डींग, रिचर्ड हॅडली यांच्यासारखी किंवा नव्या जमान्यातला ब्रेट ली अशा जलदगती गोलंदाजांसारखी अभिजात तर सोडाच पण "नॉर्मल" म्हणावी अशीही शैली नाही. नविनच गाडी शिकणारा एखादा, पहील्या गियर मध्ये झटके देत क्लच आणि गियरचा यथास्थित असा गोंधळ घालत... थांबत.. पळत... येतो.. हा बॉल टाकतोय की नाही..अशी काहीशी संभ्रमावस्था फलंदाजाच्या मनात निर्माण करत.. कमालीच्या विचित्र तऱ्हेने हात.. पाय.. शरीर याचा "त्याचाच असा खास समन्वय" साधतो... आणि कुठल्यातरी दिशेने येणाऱ्या त्याच्या उजव्या हातातून चेंडू सुटतो तोच मुळात अनपेक्षित अशा १४५ कि. मी. धडकी भरणाऱ्या वेगाने... आणि चेंडूची शिवण अगदी स्वप्नवत वाटावी अशी "सरळसोट" राखत...! तोपर्यंत चेंडू टाकायच्या त्याच्या आगळ्या, (खरं तर विचित्रच) पद्धतीमुळे जरा विचलित झालेल्या फलंदाजाकडे झेपावणाऱ्या चेंडूमध्ये वेग, उसळी, पडल्यानंतर झप्पकन आत घुसणारा तर कधी बाहेर जाणारा स्विंग असं सगळंच असतं..! तेंव्हा... हे काय पाणी आहे हे समजतं..! मैदानावर सहजभावाने वावरणाऱ्या जसप्रीतकडे पाहील्यावर छान वाटतं.. सामन्यात परिस्थिती कशीही असू दे... हा मजेत असतो.. त्याचा चेहरा हसरा असतो...पण प्रयत्नात कसूर करतोय असं कधीच वाटत नाही. परिस्थिती विपरीत असली तरी याचं (डीप स्क़्वेअर लेग ला वगैरे) एकूण बरं चाललेलं असतं.
आणि याच्या पोतडीतून नेहमीच काहीतरी चकीत करणारं निघतं..!
दंश करणारी... जहरी वाटावी अशी... उसळी मारत हेल्मेटचा वेध घेऊ पहाणारी, फलंदाजाच्या छातीचा, मांड्याचा, वेध घेणारी गोलंदाजी आपल्याला बुमराहनेच दाखवली. बैट आणि पैड च्या मधून, चवताळलेल्या नागिणी सारखा आत घुसणारा याचा ईंडीपर , जेंव्हा "काण्डकं" घेउन जातो, तेंव्हा चढणारा कैफ काही औरच असतो. अर्थात काही बाबतीत सुधारणांना वाव नक्कीच आहे. खास करून, नो-बॉल वर विकेट घेण्याच्या त्याच्या "कौशल्याचा" गांभीर्याने विचार करायची गरज आहे असं कधी कधी वाटतं.
असा हा "सदाहसत" प्रदेशातला असावा असं वाटणाऱ्या जसप्रीत ने मुंबई इंडिअन्स च्या २०१९ च्या IPL विजेतेपदात, सुरवातीपासूनच महत्वाचा वाटा उचलला. तसाच तो कालच्या अंतिम फेरीच्या सामन्यात आणि अगदी मोक्याच्या क्षणीही उचलला. फक्त १४९ धावांच्या शिदोरीवर, तगड्या CSK च्या मजबूत फ्लान्दाजीसमोर आपल्या चार षटकात केवळ १४ धावा देत दोन बळीही घेतले आणि बाजी पलटवली, आणि डोक्यावर अक्षता, कपाळाला कुंकू, हात जोडलेले आणि डोळे मिटलेल्या ध्यानस्थ अवस्थेत धावा (देवाचा... Runs नव्हे) करत बसलेल्या आपल्या मालकिणीचा जीव त्या "IPL चषकात" पाडला...!
हे करताना, दिलेर खेळाडू कसा असतो याचं जे काही प्रदर्शन जसप्रीतने केलं ते लाजवाब होतं. लक्षात रहाणारं होतं..! कालचा अंतिम सामना अगदी रोमहर्षक अवस्थेत असताना (मलिंगा ने टाकलेल्या १८ व्या षटकात २२ धावा गेलेल्या असताना) त्याच्या गोलंदाजीवर राहुल चहार ने स्केअर लेग वर एक "हलवा", आचमन करून पाणी ताम्हणात टाकावे इतक्या सहज, खाली टाकला...तो देखील कोणाचा तर दणक्यात खेळणाऱ्या शेन वाटसन चा...! त्यानंतर त्याच षटकात, शेवटचा उसळलेला चेंडू देखील यष्टीरक्षक डी'कॉक ने ही "आचमन" करून, साधारण अशाच पद्धतीने सोडला.. तो थेट सीमापार गेला. अशावेळी कुठलाही जातिवंत तेज गोलंदाज, तोंडाने कुठले "गायत्री मंत्र" म्हणतो, ते ओळखायला आपल्याला "Leap Reading" चं तज्ञ असायची मुळीच गरज नसते. ह "भ"कारी मंत्र आपल्या सगळ्यांच्या चांगल्याच परिचयाचा आहे. पण जसप्रीत नावाचा हा जिंदादिल खेळाडू, चहार ने तो झेल टाकल्यावर, एखाद्या लहान मुलाच्या निरागस खोडी कडे पहावं असं पहात, इतकं सुंदर हसला कि ज्याचं नाव ते...! डोळ्यात, चेहऱ्यावर, देहबोली यात जराही राग आणि निराशा न दाखवता...त्याच्या चेहऱ्यावर छान हसू पसरलं होतं..! असं होऊ शकतं...हे सहज मान्य करणारा त्याच्या आत दडलेला माणूस किती कमालीचा सुंदर आहे हे त्यातून साऱ्यांना दिसलं असेल. ते षटक संपल्यावर तो डी'कॉक कडेही गेला, त्याला एक घट्ट मिठी मारून त्याच्या डोक्यावर थोपटून, दोन शब्द बोलला... पुन्हा एक मस्त टवटवीत हास्य जसप्रीतच्या चेहऱ्यावर फुललं... त्यात कमालीचा प्रामाणिक भाव होता...त्यामुळे डीकॉकचं नैराश्यही थोडं कमी झालं.. आणि हा उमदा खेळाडू आपल्या जागेवर गेला..! क्षणाक्षणाला शिव्यांची लाखोली वहात, अत्यंत त्वेषाने एकमेकांवर धाऊन जात असणारे विलक्षण उर्मट खेळाडू पाहायची सवय झालेली असताना.. असा एखादा, मनात किंचितही कटुता न बाळगणारा "निर्व्याज्य माणूस" मैदानावर पहाणं फार सुखावून गेलं...! फार प्रसन्न करून जाणारं दृश्य होतं ते...! तुम्ही पाहिलं...?

मदन देशमुख, पुणे.
No comments:
Post a Comment