ओसंडून वाहिल्या होत्या आमच्या पखाली...
हिरवा कच्च शालू लेवून होती
धरित्री अवघी चिंब त्या धारांखाली...
ओढे, नालेच काय.. फुफाटा पांघरून ...
एखाद्या पायवाटे सारखी निपचित पडलेली
ही नदीही... तेंव्हा दुथडी भरून वाहिली...
हे अमृत देणारा तूच...अन नाकारणारा ही तूच...
पण मालक ना आम्ही या ग्रहाचे...
ही मस्तीही होती तशीच उधाणली...
बुद्धीच्या बले स्वयंसिद्ध अन स्वयंपूर्ण...
ही नशाही होती तशीच उफाळली...
तू दिलेली दौलतही आम्ही...
बरसली तेंव्हा निर्लज्जपणे उधळली...
दौलतजाद्या परी दो हस्ते ओवाळली...
अन आज सारे कुंभ कोरडे...
निर्जल आमुच्या ओंजळी...
ठक्क वाळले नेत्र अन...
थेंब ही न ओघळे गाली...
(सहज सुचलं म्हणून लिहिलं)
मदन देशमुख, पुणे.


No comments:
Post a Comment