"एक खेळीयाच्या" च्या स्मृतिदिनानिमित्त...
जन्म या आरंभाकडून...
मृत्यू या अटळ शेवटाकडे नेणाऱ्या...
आयुष्याच्या या वाटचालीत...
आनंदाचे, समाधानाचे, कृतकृत्यतेचे क्षण..
नेहमीच आपल्या ओंजळीत पडतात असं नाही...
उलटपक्षी... अपेक्षाभंगाचे, नैराश्याचे मळभ...
मात्र सातत्याने पाठराखण करत असतं...
मात्र जगनियंत्याला आपली काळजी सुद्धा वाटते..
म्हणून तो क्वचित आपल्या आयुष्यात
असं काही घडवतो ...
की चमत्कारावर सुद्धा विश्वास ठेवावा लागतो...
"पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे"....
हा देखील या मराठी मनांच्या विश्वात...
श्रीगणेश, सरस्वती आणि नटराज...
यांनी एकत्रितपणे घडवलेला...
असाच एक चमत्कार होता...
त्यांच्या कारकिर्दीत मी देखील जगलो...
या बद्दल मी दैवाचा सदैव ऋणी राहीन...
या निरागस मनाच्या...
अलौकिक प्रतिभावंताला...
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त....
सादर श्रद्धांजली....!
मदन देशमुख, पुणे.
No comments:
Post a Comment