"एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही की,
दारूच्या दुकानाचे वास्तुशास्त्र कोण करत असेल???
नाल्या जवळ असो...
प्रवेश दक्षिण दिशेला असो...
समोर खड्डा असो...
वा लाइटीचा ट्रांसफाॅर्मर असो...
किंवा आणखी काही वास्तु दोष असो...
दुकानात गर्दी नेहमीच असते आणि
सैराट धंदा होत असतो.."
असं म्हणतात की,
जिथे शास्त्र संपते..!
तिथे श्रद्धा प्रकटते..!
"दारूचं दुकान किंवा अड्डा" देखील असंच एक श्रद्धास्थान आहे. प्रचंड प्रमाणात सकारात्मक उर्जा तिथे अनेक मार्गाने आणि विवीध प्रकारे एकवटलेली दिसते...! मन आनंदाचं भरतं आलेलं असो की दुःखाच्या गर्तेत बुडालेलं... पण जिथे पोचल्यावर, सकारात्मक उर्जेने ते मन सोड्यासारखंच फसफसतं ते ठिकाण म्हणजे "दारूचं दुकान"..!
इथे माझ्या मनाची घालमेल संपणार आहे या खात्रीनेच माणूस जिथे पोचतो.. ते म्हणजे "दारूचं दुकान"...!
तिथे आलेली माणसं, एकतर मनात असलेली सगळी दुःखं, वेदना, शल्ये मनातून हद्दपार करायच्या हेतुने आलेली असतात, किंवा वाट्याला आलेला आनंद, सुख, समाधान द्विगुणित करण्यासाठी आलेली असतात. दोन्ही मनःस्थितीतल्या माणसांना आपलंसं वाटणारं स्थान म्हणजे "दारुचं दुकान"...!
एकदा का, या ठिकाणी मिळणारं ते मोक्षप्राप्ती कडे नेऊ शकेल असा विश्वास ज्या विषयी वाटावा असं, "तिर्थ" घेतलं आणि थोडा चकणा "प्रसाद" म्हणून चाखायला लागलं की परमात्म्याशी थेट संवाद साधू शकतात काही आत्मे..! भवतालच्या भौतिक जगापासून, इथल्या क्षणभंगुर सुख-दुःखाच्या भिंती आणि बंधने झुगारून देत त्या "टल्लीन“ झालेल्या आत्म्यास, पारलौकिक तिर्थाटन आणि दर्शन घडवणारे "तिर्थ"स्थान असतं.. "दारूचं दुकान"...!
आपला तो मित्र असतोच, पण शत्रू देखील जिथे मित्र होऊ शकतो असं रणांगण नव्हे तर "मित्रत्वाचं आंगण" असतं.. "दारुचं दुकान"...!
"तुझं ते तुझंच... पण माझं ते सुद्धा तुझंच" असं विलक्षण परोपकारी भान आणि निर्लेप वृत्ती माणसाच्या मनात निर्माण करू शकणारं स्थान.. म्हणजे "दारूचं दुकान"...!
मोक्ष.. मोक्ष.. म्हणतात तो यापेक्षा काय वेगळा असतो....?
आणि हे सगळं जिथे एकवटलेलं असतं अशा स्थानी कुठला आलाय दोष...?
एका "टल्लीरामाचं" मनोगत...
🍻🍻🍷🍷🍸🍸🍸🍷🍷🍻🍻
😝😝😝😝😜😜😜😝😝😝😝
(सहज सुचलं म्हणून लिहीलं)
मदन देशमुख, पुणे.

👌👌
ReplyDelete